राजदला मोठा धक्का, तेजप्रताप यादव पिछाडीवर

समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर तेज प्रताप यादव

0

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. एनडीए आणि महाआघाडी यांच्यामध्ये काटें की टक्कर सुरु आहे. एनडीए 124 जागांवर आघाडीवर आहे तर महागठबंधन 105 जागांवर आघाडीवर आहे.

तेजस्वी यादव यांनी झंझावाती प्रचार अभियान राबवले. मात्र, तेज प्रताप यादव समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. तेजप्रताप यादव यांच्या विरोधात जनता दलाचे राजकुमार राय निवडणूक लढवत आहेत. राजकुमार राय यांनी तेजप्रताप यादव यांच्यावर 1400 मतांची आघाडी मिळवली आहे. तेजप्रताप यादव त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. हसनपूरमधून तेजप्रताप यादव पिछाडीवर असले तरी त्यांचे सासरे चंद्रिका राय सारण जिल्ह्यातील परसा विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. चंद्रिका राय जेडीयूमधून निवडणूक लढवत आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासोबत वाद झाल्यांतर चंद्रिका राय जेडियूमध्ये गेले होते. बिहार विधानसभा निवडणूक निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री आणि जेडीयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांच्या भविष्याचा निर्णयही आज लागेल. अशावेळी नितीश कुमार यांचा जेडीयू आणि भाजप महायुतीला बहुमत मिळाले, तर नितीश कुमार एक नाव विक्रम बनवतील. बिहारचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री बनण्याची संधी नितीश कुमार यांच्याकडे आहे. यापूर्वी हा विक्रम बिहारचे पहिले मुख्यमंत्री कृष्ण सिंह यांच्या नावावर आहे. एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये काटें की टक्कर सुरू आहे. एनडीए 124 जांगावर आघाडीवर असून महागठबंधन 105 जागावंर आघाडीवर आहे. मात्र, दोन्ही आघाड्यांमध्ये टक्कर सुरु आहे. जर काटें की टक्कर सुरु राहिली तर लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. सध्या चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष 6 जागांवर आघाडीवर आहे. चिराग पासवान यांनी या जागा जिंकल्यास ते खरोखरच बिहारचे किंगमेकर ठरतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.