सोलापूर-धुळे महामार्गावर पाचोडजवळ भरधाव टँकर उलटला

टँकरचे टायर फुटल्याने रस्त्यावर पलटी झाल्याची घटना

0
 औरंगाबाद : सोलापूर-धुळे महामार्गावरील पाचोड जवळ रसायन घेऊन जाणार्‍या टँकरचे टायर फुटल्याने भरधाव टँकर रस्त्यावर पलटी झाल्याची घटना आज पहाटे चारच्या सुमारास घडली. अग्निशमन दल व महामार्ग पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने धोका टळला.
बीडकडून औरंगाबाद शहराकडे येत असताना पहाटे 4 वाजेच्या सुमारास एक मोठे टँकर कारखान्याचे रसायन घेऊन  सोलापूर-धुळे महामार्गावरील पाचोड जवळच्या मुरमा शिवाराजवळ अचानक धावत्या टँकरचा टायर फुटला. चालकांचे नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला. या घटनेची माहिती मिळताच, महामार्ग पोलिसांनी अग्निशामन दलाला पाचारण केले व रस्त्यावर पडलेले रसायन पाण्याने स्वच्छ करून क्रेनच्या साहाय्याने मोठ्या टँकरला उचलले. वाहतूक सुरळीत केली. वेळीच अग्निशामक दल आणि पोलिसांनी तत्परता दाखविल्याने  अनर्थ टळला.
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.