भरधाव ओमनी कारची दुचाकीस्वारास जोरदार धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
करमाड-पिंप्रीराजा मार्गावर मंगरूळ फाट्याजवळ घडला अपघात
करमाड : भरधाव ओमनी कारने दुचाकीस्वारास समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना करमाड-पिंप्रीराजा मार्गावर मंगरूळ फाट्याजवळ बुधवारी (दि.१४) रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. जीवनसिंग मर्दान लालछोटे (२२,रा. कारोळ, ता. औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे.
करमाड-पिंप्रीराजा मार्गावर मंगरूळ फाट्याजवळ बुधवारी (दि.१४) रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. जीवनसिंग मर्दान लालछोटे (२२,रा. कारोळ, ता. औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे. जीवनसिंग लालछोटे हे दुचाकी (क्र. एम. एच.२० एफ डी६६३९) वरून करमाडकडे येत होते. तर ओमनी कार (क्र.एम. एच.१२ इ टी ५४३५) ही करमाडहून पिंप्रीराजाकडे जात होती. बुधवारी काल सायंकाळी साडेसहा वाजता भरधाव ओमनी कारच्या चालकाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात जीवनसिंग लालछोटे हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच, पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, संदीप जाधव, नागनाथ केंद्रे यांनी घटनास्थळी जाऊन जखमीला रुग्णवाहिकाद्वारे औरंगाबाद येथील घाटी दवाखान्यात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी जीवनसिंग यांना तपासून मयत घोषित केले. अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा रात्रीपर्यंत सुरू होती. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजू नागलोत, विजयसिंग जारवाल करीत आहेत.