‘भारत नानांची आठवण येते; पण त्यांचे वस्ताद शरद पवारांनी आशीर्वाद दिल्याचा आनंद!’

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर

0

सोलापूर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले, भालके कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आहेत. शरद पवार हे पंढरपूर येथून भारत भालके यांच्या सरकोली गावाकडे जात होते, तेव्हा शरद पवारांनी आपला ताफा मध्येच  रस्त्यात  थांबवला आणि वर-वधूंना आशीर्वाद दिले.

शरद पवार हे पंढरपूर येथून भारत भालके यांच्या सरकोली गावाकडे जात होते, तेव्हा शरद पवारांनी आपला ताफा मध्येच रस्त्यात थांबवला आणि वर-वधूंना आशीर्वाद दिले. शरद पवारांनी असे अचानक येऊन, थांबून आशीर्वाद देण्याचा हा किस्सा राज्यात चर्चेचा विषय झाला आहे. नवदाम्पत्याला पाहिल्यानंतर शरद पवार यांनी थांबून वधू-वरांना आशीर्वाद दिले. यानंतर ते पुढे मार्गस्थ झाले. शरद पवारांसोबत सोलापूरचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. यावेळी नवरदेव म्हणाला, ‘भारत नानांची आठवण येते, पण त्यांचे वस्ताद शरद पवारांनी आशीर्वाद दिला याचा आनंद आहे”.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.