‘भारत बंद’ला हिंसक वळण, अंदोलक आक्रमक

0

आजच्या ‘भारत बंद’ला बिहारमध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसते. देशात अनेक राज्यांत अंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत. मात्र या अंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे.

बिहारच्या अनेक भागांमध्ये अंदोलकांकडून दुकाने बंद केली जात आहे. तसेच येथे अंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाली असून यात पोलिस जखमी झाल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी जमावाला पसरवण्यासाठी अश्रूधूरांच्या नळकांड्या फोडल्या असल्याची माहिती आहे. अनेक अंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी देशात सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

बिहारच्या आरा भागात लोकमान्य टिळक एक्सप्रेस आणि 509 अप पॅसेंजर रेल्वे थांबवली आहे. तसेच पाटण्यात सकाळीच अंदोलकांनी नॅशनल हायवे 83 बंद केला आहे.

राजस्थानमध्ये कलम 144 लागू

राजस्थानमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे, तसेच इंटरनेट सेवाही बंद केली आहे. भारत बंदमुळे शाळांना सुटी देण्यात आली आहे.

यूपीमध्ये हायअलर्ट

यूपीच्या मेरठमध्ये 6 जिल्ह्यात हायअलर्टच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गाजियाबाद इलाहाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच सहारनपूरमध्ये इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात 2 एप्रिल रोजी दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या भारत बंद वेळी उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये हिंसाचार झाला होता. याच बंदला प्रत्युत्तर म्हणून जातीवर आधारित आरक्षणाविरोधात काही संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.