मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड?

भाई जगताप यांच्या नावाची अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसांत होणार

0

नवी दिल्ली :मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड निश्चित मानली जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड निश्चित मानली जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाई जगताप यांच्या नावाची अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसांत होणार असल्याचेही समजते. विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा होती. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये खांदेपालट करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या अध्यक्षपदासाठी वेगवेगळे नेते जोरदार लॉबिंग करत होते. त्यात मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, वर्षा गायकवाड यांचाही समावेश होता. मुंबईतील नेत्यांची दिल्लीत ये-जा वाढली होती. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्लीवारी केली होती. त्यात आता भाई जगताप यांनी बाजी मारल्याचं दिसत आहे.

कोण आहेत भाई जगताप?  : अशोक जगताप यांची भाई जगताप या नावाने ओळख., भाई जगताप काँग्रेसच्या तिकीटावर विधान परिषद आमदार. , जगताप यांच्या आमदारकीची दुसरी टर्म., भाई जगताप याआधी विधानसभेवरही निवडून गेले होते, मात्र गेल्या निवडणुकीत पराभव.

विशेष म्हणजे भाजपाने आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी मराठमोळ्या अतुल भातखळकरांकडे जबाबदारी दिली आहे. त्यात आता काँग्रेसनेही भाई जगताप यांची निवड जवळपास निश्चित करुन मराठी चेहरा देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. आगामी मुंबई पालिका निवडणूक ही मराठी विरूद्ध मराठी विरूद्ध मराठी नेते, अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्रामधील संघटनात्मक फेरबदलावर काँग्रेस पक्षाची दिल्लीत बैठक पार पडली. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल, आशिष दुवा, महाराष्ट्र प्रभारी सचिव उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये संघटन फेरबदल आणि जिल्ह्याध्यक्ष बदलावर चर्चा झाली. जानेवारीत काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अध्यक्ष बदलणार आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण होते?  : भाई जगताप यांच्यासह माजी आमदार चरणसिंह सप्रा, माजी मंत्री सुरेश शेट्टी यांची नावे मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.