वाहनांवर जातीसूचक शब्दांचा वापर केला तर खबरदार…

जातीसूचक शब्द लिहिलेला असेल तर हटवा, अन्यथा तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागेल

0

लखनऊ :तुमच्या बाईकवर किंवा गाडीवर एखादा जातीसूचक शब्द लिहिलेला असेल तर तत्काळ हटवा, अन्यथा तुम्हाला मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने जातिसूचक शब्दांविरोधात कडक कारवाई करण्याच्या धोरणाचा अवलंब केला.

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने जातिसूचक शब्दांविरोधात कडक कारवाई करण्याच्या धोरणाचा अवलंब केला.त्यामुळे गाडीवर खान, यादव, क्षत्रिय, पंडित, राजपूत, मौर्य, जाट यांसारख्या जातिसूचक शब्दांचा वापर केलेला असेल तर उत्तर प्रदेश ट्रॅफिक पोलिस तुमच्याविरुद्ध कारवाई करू शकतात. गाडीवर जातिसूचक शब्द लिहिलेले आढळल्यास गाड्या जप्त करण्याचीही कारवाई होऊ शकते.परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीची नंबर प्लेट चुकीच्या आकाराची आणि आकडे आडवे-तिडवे लिहिलेले आढळले तर पाच हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. जातिसूचक शब्द लिहिलेले आढळल्यास आरोपीवर कारवाई केली जाईल. हा गुन्हा करताना पहिल्यांदा आढळल्यास ५०० रुपये आणि दुसऱ्यांदा आढळल्यास १५०० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.उत्तर प्रदेशच्या राजकारणात आणि सामाजिक व्यवस्थेत जातीय समीकरणे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. या संबंधात केंद्र सरकारला वारंवार तक्रारी मिळत होत्या. गाड्यांवर जातीवाचक उल्लेखामुळे उत्तर प्रदेशात गाड्यांवर जातीयवाद वाढीस लागत असल्याचा आरोपही होत होता. आपली जात वरिष्ठ आणि इतरांची जात कनिष्ठ दाखवण्याचा प्रयत्नही या माध्यमातून होत होता. याच आधारावर पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तर प्रदेश सरकारला एक पत्र लिहून यावर बंदी आणण्याचे निर्देश देण्यात आले होते. सभ्य समाजासाठी या पद्धतीची भाषा योग्य नसल्याचेही यात म्हटले होते.पंतप्रधान कार्यालयाकडून निर्देश मिळताच उत्तर प्रदेश सरकारने गाड्या जप्त करण्यासोबतच इतर कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांना दिले. लोकांमध्ये यासंबंधी जागरुकता निर्माण करण्यासाठी एक मोहिमही उत्तर प्रदेश सरकारकडून चालवली जाऊ शकते. किंबहुना, मोटार वाहन कायद्यानुसार, गाडीच्या नंबर प्लेटवर नंबरशिवाय आणखी काहीही लिहिलेले आढळल्यास परिवहन विभाग अशा गाड्यांविरुद्ध आणि त्या गाड्यांच्या मालकांविरुद्ध योग्य ती कारवाई करू शकतात.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.