विश्वास बसणार नाही, पण अलास्कातील ‘या’ शहरात आता थेट 2021 मध्ये सूर्योदय होणार

सूर्योदय आणि सूर्यास्त बघायची सवय असणाऱ्या तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरे

0

जुनो : अलास्कामधील एका शहरात आता पुढचा सूर्योदय थेट 2021 मध्येच होणार आहे. दररोज सूर्योदय आणि सूर्यास्त बघायची सवय असणाऱ्या तुम्हाला हे वाचून नक्कीच लगेच विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे.
अलास्कातील उत्कियाग्विक नावाच्या शहरात तब्बल 66 दिवसांनी सूर्योदय होणार आहे. या शहरातील या वर्षीचा शेवटचा सूर्यास्त 18 ऑक्टोबर रोजी झाला. अनेक लोकांनी या वर्षीच्या शेवटच्या सूर्यास्ताचा व्हिडीओ आणि फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरवर्षी होणाऱ्या या बदलाला ‘पोलर नाईट’ असे म्हणतात. या भागात 23 जानेवारी 2021 पर्यंत सूर्योदय होणार नाही. मात्र, त्याचा अर्थ असाही नाही की, त्या काळात फक्त अंधारच राहील. या ठिकाणी दिवसातून काही तास प्रकाश असेल, फक्त आकाशात सूर्य तळपताना अथवा चमकताना दिसणार नाही. इंस्टाग्रामवर किर्स्टन अलबर्ग यांनी सूर्यास्ताचा एक छोटासा व्हिडीओ शेअर केला. यात त्यांनी म्हटले आहे की, हा उत्कियाग्विकमधील वर्ष 2020 चा शेवटचा सूर्यास्त. त्यांनी हा क्षण पाहताना डोळे ओले झाल्याचेही म्हटले. उत्तर ध्रुवाला आर्कटिक सर्कल म्हणतात. दुसरीकडे दक्षिण ध्रुवाला अंटार्कटिक सर्कल म्हणतात. अलास्काचे उत्कियाग्विक शहर आर्कटिक सर्कलमध्ये येतं. त्यात हे छोटेसे शहर इतर शहरांच्या तुलनेत जास्त उंचीवर आहे. अशात 18 नोव्हेंबरनंतर या शहराच्या आकाशात सूर्य नसल्यात जमा आहे. नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत उत्कियाग्विकमध्ये कडाक्याची थंडी पडते. या काळात येथील तापमान मायनस 23 डिग्रीपर्यंत खाली जाते. याशिवाय येथील दृष्यता देखील प्रचंड कमी होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.