निवडणुकांची रणधुमाळी सुरू; पदवीधर मतादरसंघांची निवडणूक जाहीर

राज्यात5 पदवीधर मतदारसंघाच्या निडणुकांसाठी 1 तारखेला मतदान; आचारसंहिता लागू

0

मुंबई : देशातील बिहार, उत्तर प्रदेशपासून ते थेट जगात महासत्ता असलेल्या अमेरिकेपर्यंत सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. याबरोबरच राज्यातील पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांचाही श्रीगणेशा झाला. राज्यातील 5 पदवीधर मतदारसंघाच्या निडणुकांसाठी 1 डिसेंबरला मतदान होणार असून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे.

निवडणूक आयोगाकडून राज्यात एकूण 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर 2 जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी पुढील महिन्यात (डिसेंबर) 1 तारखेला मतदान होईल तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून सतीश चव्हाण आणि नागपूरमधून अनिल सोले यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपला. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडणूक जिंकून विधानसभेवर गेल्याने पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा रिक्त राहिली. एकूण पदवीधर मतदारसंघाच्या तीन जागा रिक्त आहेत. तर शिक्षक मतदरासंघातून अमरावती विभातून श्रीकांत देशपांडे आणि पुणे विभागातून दत्तात्रय सावंत यांचा कार्यकाळसुद्धा जुलै महिन्यात संपला. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातून अमरावती आणि पुणे विभागाच्या दोन जागा रिक्त आहेत. या पाचही जागांवर 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.