बीडच्या ‘गजानन सहकारी सूतगिरणी’ची परदेशात उत्तुंग भरारी

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते पूजन करून कंटेनर रवाना

0

बीड  : कोरोनाच्या लॉकडाउन काळात ईट ता बीड येथील श्री गजानन सहकारी सूतगिरणीने उत्तुंग भरारी घेतली असून गुणवत्तापूर्ण सुताची बीड जिल्ह्यामधून पहिल्यांदाच चीन या देशात निर्यात होऊ लागली आहे सुतगिरणीचे चेअरमन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते पूजन करून सुताचे कंटेनर मुंबई बंदरासाठी रवाना करण्यात आले आहे.

श्री गजानन सूत गिरणीत उपलब्ध असलेल्या अद्यावत यंत्रावर तयार करण्यात आलेल्या 16 व 20 काउंट या दर्जेदार सुतास मंदीच्या काळातही मोठी मागणी आहे सध्या एकूण 10 कंटेनर द्वारा 200 टन सुताची मागणी या देशातून नोंदविण्यात आली आहे ज्यादा भाव मिळत असल्याने व सूत गिरणी एक्सपोर्ट ऑब्लिगेशन पूर्ण करायचे आहे म्हणून सूतगिरणीने सूत निर्यातीला प्राधान्य दिले आहे. सूतगिरणीचे चेअरमन तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर उपाध्यक्ष माधवराव मोराळे, कार्यकारी संचालक व्ही एस काळे तसेच सर्व संचालक मंडळ सर्व कामगार कर्मचारी अधिकारी यांच्या सहकार्याने सूतगिरणीचे टाळेबंदी नंतर तीन पाळ्यांत पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू आहे. विशेष म्हणजे कामगारांच्या सहभागातून 92 टक्के उत्पादन क्षमतेचा वापर होत आहे
या सूतगिरणीत याच परिसरातील ग्रामीण भागातील कामगार कार्यरत आहेतय 270 कामगारांमध्ये 50 महिला कामगार तर 220 पुरुष कामगार आहेत. याचबरोबर याशिवाय या सूतगिरणीमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या तीनशे व्यापारी व जिनिंग चालक, यांनाही मोठा फायदा होऊ लागला आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या या सूतगिरणीमुळे आता विदेशात निर्यात सुरू झाली. यावेळी दूध संघाचे अध्यक्ष विलास बडगे, श्रीकांत शिंदे, लक्ष्मण मस्के, शेख अलीम, एस के जगताप, सतीश कांबळे, शेख एस. ए.,इंजि कृष्णा औंधकर,घाडगे आदींची उपस्थित होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.