बीडमधील प्रेयसीवर अ‍ॅसिड व पेट्रोल जळीतप्रकरणी नवी घडामोड, हत्येचा होणार खुलासा

मुख्य आरोपी अविनाश राजुरेला शनिवारी नांदेडमधील देवलूर परिसरातून अटक

0

बीड : बीडमध्ये  प्रेयसीवर अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून हत्या केल्या प्रकरणी मुख्य आरोपी अविनाश राजुरेला अटक केल्यानंतर बीड पोलिसांच्या  ताब्यात देण्यात आले होते. आज आरोपी अविनाश राजुरेला न्यायालयात हजर केले असता  त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुुनावली आहे. लवकरच हत्येचा कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

अ‍ॅसिड व पेट्रोल जळीत प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश राजुरेला शनिवारी नांदेडमधील देवलूर परिसरातून अटक केली होती. त्यानंतर रात्री त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात  देण्यात आले होते. आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात दुपारी 12.30 वाजता अविनाशला हजर केले असता,  आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कदिर अहम्मद न सरवरी यांच्यासह दिवाणी न्यायधीश यांनी आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. हत्या का केली, हेतू काय होता आणि या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे का ? हा तपास बाकी असल्यामुळे 8 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. न्यायालयात दहा दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयाच्या दंडाधिकारी यांनी आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती विभागीय पोलिस भास्कर सावंत यांनी दिली. आरोपीने गुन्हा कबूल केला असून पुढील तपास सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

काय आहे जळीत प्रकरण?

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील सावित्रा दिगंबर अंकुलवार ( वय 22)  तरुणीचं याच गावातील अविनाश राजुरे याच्यासोबत प्रेमसंबंध होते.   गेल्या काही दिवसांपासून दोघेही जण पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे 3 वाजेच्या सुमारास  येळंब (घाट) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा -केज हा मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर या अविनाशने रस्त्याच्या बाजूला अगोदर सावित्रावर अ‍ॅसिड टाकले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून सावित्राला पेटवून दिले. तरुणीला पेटवून दिल्यानंतर अविनाश घटनास्थळावरून फरार झाला होता. या घटनेत सावित्रा 48 टक्के भाजली होती. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या 24 तासांत आरोपी अविनाशला अटक करण्यात आली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.