B’day : पहा इमरान हाश्मीचे कुटुंबियांसोबतचे खास फोटो

0

सिरिअल किसर इमरान हाश्मी आज आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. 24 मार्च रोजी 1979 रोजी त्याचा जन्म उत्तर प्रदेशमधील कनौजीमध्ये झाला. इमरानचे वडिल अनवर हाश्मी अभिनेता होते तसेच त्याची आई माहिरा हाश्मी दिग्दर्शक महेश भट्ट यांची बहिण होती. या नात्याने महेश भट्ट आणि मुकेश भट्ट इमरानचे मामा आहेत. पूजा, आलिया भट्ट त्याच्या बहिणी तर मोहित सूर त्याचा भाऊ आहे.

इमरानने बालपणी त्याचे नाव बदलून फरहान ठेवले होते. नंतर पुन्हा तो इमरान नावाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने मुंबईच्या sydenham कॉलेजमधून पदवी शिक्षण घेतले. इमरानने डिसेंबर 2006मध्ये परवीन शहानी या तरुणीशे लग्न थाटले.

इमरानला एक मुलगा आहे, त्याचे नाव अयान आहे. अयानला काही वर्षांपूर्वी कर्करोग झाला होता. मात्र परदेशात उपचार घेतल्यानंतर अयान आता बरा झाला आहे.

इमरानने काही दिवसांपूर्वी एक पुस्तक लिहिले होते, त्याचे नाव ‘किस ऑफ लाइफ’ होते. हे पुस्तक मुलगा अयानच्या कॅन्सरच्या लढाईवर आधारित होते. या पुस्तकासाठी त्याचे अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानसारख्या सुपरस्टारने कौतुक केले होते.

इमरानने महेश आणि मुकेश भट्ट यांच्या कॅम्पमधून करिअरला सुरुवात केली. त्याने ‘फुटपाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट फ्लॉप झाला.

याचवर्षी त्याने ‘मर्डर’ चित्रपटात काम केले. या चित्रपटात साकारलेल्या नकारात्मक भूमिकेसाठी त्याला स्टारडस्ट अवॉर्डकडून नवोदित अभिनेता पुरस्कार मिळाला होता.

या चित्रपटानंतर इमरानने ‘गँगस्टर’, ‘जहर’, ‘आशिक बनाया आपने’, ‘चॉकलेट’, ‘कलयुग’, ‘अक्सर’सारखे अनेक हिट चित्रपट दिले.

इमरानने पहिल्यांदा ‘मर्डर’ चित्रपटात लाँग किसींग सीन दिला होता. त्यानंतर तो सिरिअल किसर नावाने ओळखला जाऊ लागला.

त्याने 15 वर्षांत तब्बल 37 चित्रपटांत काम केले. तसेच त्याने ‘राज 3’ चित्रपटात बिपाशा बसूसोबत तब्बल 20 मिनीटे किसींग सीन दिला होता. आतापर्यंतचा त्याचा हा सर्वात लाँग किसींग सीन मानला जातो.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.