बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ‘वुडलँड’ रुग्णालयात दाखल

जिममध्ये चक्कर आल्यामुळे पडले, छातीत त्रास झाल्यानंतर हलवले रुग्णालयात

0

कोलकाता : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि वर्तमानातील बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीची तब्येत शनिवारी अचानक बिघडली. गांगुलीला कोलकाताच्या वुडलँड रुग्णालयामध्ये छातीत त्रास झाल्यामुळे  दाखल करण्यात आले आहे.

 भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि वर्तमानातील बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीची तब्येत शनिवारी अचानक बिघडली.  बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यायामशाळेत व्यायाम करताना त्याची तब्येत बिघडली आहे. हात आणि पाठीत दुखत असल्याने आणि डोळ्यासमोर अंधारी आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सौरव गांगुलींवर रुग्णालयाकडून अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे. डॉक्टर सरोज मंडल तसेच इतर तीन डॉक्टर हे गांगुलीवर अँजिओप्लास्टी करणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करत, सौरव गागुंलीची तब्येत लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना केली आहे. हर्षा भोगले यांनीही गांगुली लवकरात लवकर बरे व्हावे, असे म्हटले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.