बावनकुळे इतके हुशार, मग तिकीट का कापले? हे कसले चौकीदार, हे तर थकबाकीदार : ऊर्जामंत्री

28 हजार कोटी केंद्र सरकार आमचे देणे आहे. केंद्राने ते पैसे दिल्यास आम्ही वीजबिल माफीला तयार

0

मुंबई  : मागील ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा अभ्यास इतकाच चांगला असेल, त्यांनी इतकेच चांगले काम केले असेल, तर मग त्यांना तुम्ही विधानसभेला तिकीट का नाही दिले?, असा प्रश्न  ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊतांनी उपस्थित केला आहे.  ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, 28 हजार कोटी रुपये केंद्र सरकारचे देणे आहे. केंद्राने ते पैसे दिल्यास आम्ही कधीही वीजबिल माफी करायला तयार आहोत.

भाजपने जीएसटी थकबाकीच्या वसुलीसाठी आंदोलन केले पाहिजे. हे म्हणतात आम्ही चौकीदार आहोत. हे कसले चौकीदार हे तर जीएसटीचे थकबाकीदार आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे म्हणत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मीटर रीडिंगप्रमाणे जी वीजबिले आली आहेत, ती भरली गेलीच पाहिजेत. महाविकास आघाडीचे हे गरिबांचे सरकार आहे, शेतकऱ्यांचे सरकार आहे, जनतेने निवडून दिलेले सरकार आहे. मागच्या सरकारने कर्जाचा डोंगर उभा करून ठेवलेला आहे. त्यामुळे आजची परिस्थिती वीजबिल माफीसारखी नाही. भाजपचे हे पाप आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. नेहमी हे लोक म्हणतात, आमचा अभ्यास दांडगा आहे. आम्ही सगळ्यात जास्त चांगले काम करतो. तुम्ही मग मागच्या मंत्र्यांना तिकीट का दिले नाही. त्यांना विधानसभेचे तिकीट द्यायलाच पाह्जे होते आणि पुन्हा त्यांना प्रस्थापित करायला पाहिजे होते. तुम्ही त्यांचं ऐन वेळी तिकीट का कापले. आता म्हणता तुम्ही खूप चांगले काम झालेले आहे. मागच्या ऊर्जामंत्र्यांना हीच तुमची शाब्बासकी आहे का?, हा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झालेला आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.जीएसटीचे पैसे केंद्राने अद्याप दिलेले नाहीत. 100 युनिट वीजबिल माफीबाबत गट तयार करण्यात आला आहे. कोरोना काळात गटाच्या बैठका झाल्या नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. वाढीव बीजबिलाच्या मुद्द्यावरून भाजपने आंदोलन सुरू केले असून मंत्रालयावरही मोर्चा आणण्याचा इशारा भाजपने दिला आहे. त्याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे, असं राऊत यांना विचारलं असता भाजपने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले तर आनंदच होईल. कारण मी केंद्राला वारंवार पत्र लिहून ऊर्जा विभागाकडे 10 हजार कोटींच्या अनुदानाची मागणी केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.