नांदेड-लातूर महामार्गावर आमदार, खासदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला आंघोळ
राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी 'वंचित'च्या कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन
नांदेड ः नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले असुन या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याचा निषेध करत लोहा येथे आमदार आणि खासदार यांच्या पुतळ्याला रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्याने आंघोळ घालण्यात आली.
नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडलेले असून या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याचा निषेध करत लोहा येथे आमदार आणि खासदार यांच्या पुतळ्याला रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्याने आंघोळ घातली. ..बहारो…फुल बरसाओ आमदार चुनके आया है.. असे विडंबनात्मक गीत गात खड्ड्यांवर फुलांचा वर्षावदेखील करण्यात आला. तसेच एका कार्यकर्त्याने खड्ड्यातील पाण्यात लोटांगण घालून आपला रोष व्यक्त केला. ‘वंचित बहुजन आघाडी’च्या या अनोख्या आंदोलनाने नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. तर दाजी भाऊजीच्या राजकारणाने मतदारसंघाच्या विकासाची वाट लागल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.