बारामती हादरले! मंदिराच्या गाभाऱ्यात घडला धक्कादायक प्रकर

शहरातील विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात घडली ही धक्कादायक घटना

0

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे होमटाऊन असलेल्या बारामती शहरात विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात एका वयोवृद्ध व्यक्तीने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील वनवे मळा परिसरातील विठ्ठल मंदिरात शनिवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. काशीनाथ उर्फ नाना वनवे (वय 60) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलिस पुढील तपास करत आहेत. काशीनाथ वनवे हे माळकरी सांप्रदायिक असल्याची माहिती मिळाली आहे. बारामती शहरातील वनवे मळा येथे शनिवारी काशिनाथ सीताराम वनवे यांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. काशिनाथ वनवे यांचे स्वतःचे विठ्ठल मंदिर होते. ते नेहमीप्रमाणे सकाळ- संध्याकाळ या मंदिरात पूजाअर्चा करत होते. परंतु सायंकाळी त्यांनी याच मंदिराच्या गाभाऱ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. काशिनाथ वनवे यांच्या आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप समजले नाही. पोलिसांनी काशिनाथ वनवे यांचा मृतदेहाचा पंचनामा असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद आहेत. काशिनाथ वनवे यांनी याच कारणामुळे तर आत्महत्या केली नाही ना, अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे. राज्य सरकारने अनलॉकमध्ये हॉटेल, बार, रेस्टॉरंट्स, काहीअंशी मुंबई लोकलसेवा सुरु केली आहे. तरी राज्यातील मंदिरे अद्याप बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत मंदिरे सुरु करण्याची मागणी केली होती. यानंतर राज्यपालांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. मात्र, मंदिरे उघडल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका जास्त आहे, हे कारण पुढे करत राज्य सरकारने अद्याप मंदिरे खुली केलेली नाहीत. त्यामुळे आक्रमक झालेल्या तुषार भोसले यांनी मंदिरांचे कुलूप तोडण्याचा इशारा दिला आहे.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.