वर्ध्यात बँकेवर दरोडा; दरोडेखोरांनी लाखोंची रोकड आणि लुटले साडेतीन किलो सोने

दरोडेखोराने बँक व्यवस्थापकांस पिस्तूलाची धमकी..., घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

0

वर्धा : वर्ध्यातील बँकेवर आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास दरोडा पडला. दरोडेखोरांनी लाखोंची रोकड आणि साडेतीन किलो सोने लुटले. त्यानंतर कर्मचाऱ्यांची दुचाकी घेऊन पसार झाले.

वर्ध्यातील बँकेवर आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास दरोडा पडला.  वर्ध्यामध्ये ‘मुथ्थु्ट फायनान्स’च्या शाखेवर आज, सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी दरोडा पडला. दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून तीन लाख १८ हजार रुपयांची रोकड आणि साडेतीन किलो सोने लुटले. लुटीनंतर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या दुचाकीवरून पोबारा केला. दरोडेखोराने बँक व्यवस्थापकांच्या कमरेला पिस्तूल लावले आणि चेंबर पेटीतून लाखोंची रोकड लंपास केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.वर्धा पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली आहे. बोटांचे ठसे आणि दरोडेखोरांचे रेखाचित्र तयार करण्याचे काम सुरू आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली जात आहे. सकाळी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे वर्ध्यामध्ये खळबळ माजली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.