बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’चे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे कार्य पुढील पिढ्यांना प्रेरणा देईल, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी केले. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे गाव आणि गोरगरीबांच्या विकासासाठी आणि शिक्षणाबद्दलचे योगदान असो किंवा महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील यशासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, त्यांचे कार्य पिढ्यांना प्रेरणा देईल, असे उद्घार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काढले.

पंतप्रधान  मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीला मराठीतून महाराष्ट्राचा गौरव करत वंदन केले. ते म्हणाले, मी आधीच वेळ दिला होता. मात्र, कोरोनामुळे येथे येऊ शकलो नाही.  कोरोनामुळे आज व्हर्चुअल पध्दतीने पुस्तकाचे प्रकाशन करत आहे,  मी त्यांचे काम पाहिले आहे. समाजासाठी राजकारण आणि सत्ता हे पथ्य मी नेहमी पाळले. समाजाच्या भल्याकरिता त्यांनी कार्य केले आहे. देशात पहिल्यांदा शेतकऱ्यांची चिंता त्यांनी व्यक्त केली. अनेक योजना राबविल्या. शेतीत नवीन आणि जुन्या पध्दतीचा ताळमेळ ठेवण गरजेचे आहे. साखर कारखान्यातून आता इथेनॉलही उत्पादन होत आहे. इथेनॉलचा वापर वाढला की, बाहेर जाणारा पैसा शेतकऱ्यांच्या खिशात येईल, असे मोदी यांनी  स्पष्ट केले.  विखेंना पाणी परिषदेच्या माध्यमातून जण आंदोलन छेडले होते. देवेंद्र सरकारची पाण्यावर काम ही मोठी उपलब्धी आहे. ९० योजनांवर  सध्या काम सुरू आहे. त्याचा मोठा फायदा होणार आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित होते. त्यांनी विखेंबद्दल आपले विचार व्यक्त केले. प्रवरानगर येथे मंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुभाष भामरे, हरीभाऊ बागडे, हर्षवर्धन पाटील, सुनंदा पवार, प्राजक्त तनपुरे, पोपटराव पवार, सुरेश धस, वैभव पिचड, बबनराव पाचपुते, खासदार सुजय विखे, खासदार प्रीतम मुंडे, धैर्यशील माने हे उपस्थित होते. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांचे ‘देह वेचावा कारणी’ हे आत्मचरित्र आज प्रकाशित करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थिती होती. दरम्यान, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नामांतर लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था असे करण्यात आले आहे. १९६४ साली नगरच्या लोणी इथं प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली होती. त्यांचे वडील विठ्ठलराव विखे-पाटील यांनी प्रवरानगर येथे आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना सुरु केला होता. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सामान्यासाठी त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या. तब्बल आठ वेळा ते लोकसभेचे खासदार झाले.ते मूळचे काँग्रेस पक्षाचे; परंतु ते काहीकाळ शिवसेनेत होते. राजीव गांधी पंतप्रधान असताना विखे-पाटील यांनी देशभरातील ४५ खासदारांना एकत्र करून काँग्रेस फोरम फॉर ॲक्शन स्थापन करून आपले वेगळेपण सिद्ध करून दाखवले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.