बाळासाहेब ठाकरे असते तर झाडे तोडणाऱ्याना फटकारले असते – शरद पवार

0

औरंगाबाद : मराठवाडयात औरंगाबाद मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधण्यासाठी जर उद्यानातील झाडे तोडली असती आणि हे बघण्यासाठी बाळासाहेब स्वतः असते तर झाडे तोडणार्यांना त्यांनी फटकारले असते. असे वक्तव्य  खा. शरद पवार यांनी महात्मा गांधी मिशन येथे अंकुशराव कदम यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात केले. या अमृत महोत्सव सोहळ्यात एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुश कदम यांनी पंच्चाहत्तरी पूर्ण केल्याबद्दल तसेच सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल जुन्या आठवणींना शरद पवार यांनी उजाळा दिला. तसेच आपल्या भाषणात पुढे बोलताना ते म्हणाले की पर्यावरण राखणे हि आपली सर्वांची जबाबदारी याला सर्वांनी हातभार लावला पाहिजे. त्यामुळे स्मारकासाठी झाडे तोडू नका तर स्मारक बनवण्याची जबाबदारी एमजीएम कडे सोपवा अश्या मिश्किल भाषेत टिपणी करत त्यांनी झाडे तोडू इच्छिणाऱ्यांना टोला हि लगावला. मराठवाड्यातील आजची पिढी कर्तृत्ववान आहे त्यांना प्रफुल्लित करण्याची गरज आहे.
एमजीएम म्हणजे सेवा,संशोधन,शिक्षण याचा अखंड स्रोत आहे आणि मराठवढ्याच्या प्रगती साठी असाच हातभार लावत राहील. या वेळी कार्यक्रमतात दिलीप वळसे पाटील,अंकुशराव कदम,आदींची उपस्थिती होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.