वसुसायगावमध्ये ‘ॲक्शन फॉर फूड प्रॉडक्शन’ आणि ‘बजाज’ यांच्या वतीने जनजागृती

संस्थेचे व्यवस्थापक महेश क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

0

औरंगाबाद  :  वसुसायगाव या गावांमध्ये ॲक्शन फॉर फूड प्रॉडक्शन आणि बजाज यांच्या संयुक्त विद्यमाने पीयू आायएनएमएच-115   जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेतकरी व शेतमजुरांना माहितीपत्रके देऊन मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कोविड-१९ संसर्ग थांबवण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाची पालन करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे व्यवस्थापक महेश क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

वसुसायगाव या गावांमध्ये ॲक्शन फॉर फूड प्रॉडक्शन आणि बजाज यांच्या वतीने पीयू  आयएनएमएच-115 मधील मधील वसुसायगाव या गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेतकरी व शेतमजुरांना माहितीपत्रके देऊन मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कोविड-१९ संसर्ग थांबवण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाची पालन करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे व्यवस्थापक महेश क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्पांतर्गत गावातील शेतकरी व शेतमजुरांना पीक संरक्षण, पाणी व्यवस्थापन, जमिनीची आरोग्य, जैवविविधता, धाग्यांची गुणवत्ता, सुहित कामे व प्रभावी व्यवस्थापन प्रणाली या बी सी आय च्या सात तत्वांना धरून गावांमध्ये कृषी जनजागृती रथा मार्फत कीटकनाशकांमुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम, बालमजूर, शेतमजुरांचे किमान व समान वेतन संबंधित  माहिती दिली, त्याचबरोबर गावातील मोक्याच्या ठिकाणी भिंतीपत्रके लावण्यात आली असून उपस्थित शेतकरी व शेतमजुरांना माहितीपत्रके देऊन मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कोविड-१९ संसर्ग थांबवण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाची पालन करावे. या कार्यक्रमासाठी संस्थेचे व्यवस्थापक महेश क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमासाठी शेतकरी भाऊसाहेब मोरे, कैलास भोसले, ज्ञानेश्वर शेलार , राजू धनेधर, विठ्ठल नरोडे, बाबासाहेब औंटे तसेच गावातील इतर प्रतिष्ठित व्यक्ती व कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.  सदर उपक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेतील कृषीमित्र काकासाहेब चव्हाण ,कल्याण घायवट, आकाश सरोवर व निलेश साळुंखे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.