शेतकऱ्यांविषयी सत्ताधाऱ्यांना कवडीचीही नाही आस्था, पंजाबचा शेतकरी पाकिस्तानी आहे का? पवारांचा संतप्त सवाल

राज्याच्या 21 जिल्ह्यांचे शेतकरी नाशिकहून मुंबई म्हणजेच 180 किलोमीटरपर्यंत काढत आहेत रॅली

0

मुंबई  : कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज राज्यातील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आझाद मैदानावर पोहोचले आहेत.

शरद पवार यांनी आझाद मैदानावर येत केंद्र सरकारला फटकारले आहे. ही लढाई केवळ शेतकऱ्यांची नाही तर ही आपल्या सर्वांची लढाई आहे. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, त्यांना शेतकऱ्यांविषयी कवडीचीही आस्था नाही, असे म्हणत पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. शेतकरी गेल्या 60 दिवसांपासून आंदोलन करत रस्त्यावर बसला आहे. मात्र देशाच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची चौकशी केली का? असा सवालही पवारांनी उपस्थित केला.

पंजाबचा शेतकरी पाकिस्तानी आहे का?

दिल्लीत आंदोलन करत असलेला शेतकरी हा पंजाब आणि हरियाणामधील आहे, असे बोलले जात आहे. मात्र पंजाबचा शेतकरी आहे म्हणून काय झाले? पंजाबचा शेतकरी हा पाकिस्तानी आहे का? असा संतप्त सवालही पवारांनी केला. कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आता महाराष्ट्राचे शेतकरीही सामिल झाले आहेत. राज्याच्या 21 जिल्ह्यांचे शेतकरी नाशिकहून मुंबई म्हणजेच 180 किलोमीटरपर्यंत रॅली काढत आहेत. शनिवारी रात्री नाशिकहून सुरू झालेली ही रॅली आज मुंबईत पोहोचत आहे.ते मुंबईतील आझाद मैदानात सभा घेतील. यानंतर ते आझाद मैदान ते राजभवनापर्यंत कृषी कायद्याविरूद्ध मोर्चा काढतील. ज्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सामिल होऊ शकतात. अखिल भारतीय किसान सभेने ही रॅली आयोजित केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना एक निवेदनही देणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र शाखेने दावा केला आहे की, नाशिकमधील सुमारे 15,000 शेतकरी शनिवारी टॅम्पो, पायी व इतर वाहनांनी मुंबईला रवाना झाले आहेत.

त्यांच्यावर ड्रोनवरुन ठेवली जात आहे  नजर
शेतकरी रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दक्षिण मुंबई येथील आझाद मैदान आणि त्याच्या आजुबाजूच्या परिसराच्या सुरक्षेची विशेष तयारी केली आहे. त्याशिवाय राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) चे जवान तैनात केले आहेत. या मोर्चावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे.असा होता शेतकऱ्यांचा 180 किलोमीटरचा प्रवास एआयकेएसनुसार, मुंबईसाठी कूच करणाऱ्या शेतकऱ्यांनी रात्री आरामासाठी इगतपुरी जवळच्या घाटनदेवी येथे मुक्काम केला. रविवारी सकाळी शेतकरी कसारा घाटाच्या रस्त्याने मुंबईसाठी रवाना झाले. कसारा घाटापर्यंत काढलेल्या सात किलोमीटर लांब मोर्चामध्ये महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता. हा मोर्चा सकाळी नऊ वाजता सुरू झाला आणि 11:30 वाजता संपला. नंतर शेतकरी वाहनांच्या माध्यमातून पुढील प्रवासाला निघाले. कसारा घाट मोर्चाचे नेतृत्व एआयकेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, प्रदेश युनिटचे प्रमुख किसन गुजर व सरचिटणीस अजित नवले यांनी केले. इंडियन ट्रेड युनियन सेंटरशी संबंधित इगतपुरी आणि शाहपूर तहसील कारखानदारांनी (सीआयटीयू) या शेतकर्‍यांचे फुलांचा वर्षाव करुन स्वागत केले.

पवार यांनी केंद्राला दिला होता इशारा
कडाक्याच्या हिवाळ्यात दिल्ली सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांविषयी बोलताना पवार यांनी केंद्र सरकारला इशारा दिला की, जर ते शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी झाले नाहीत तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. ते म्हणाले होते की, सरकारने शेतकर्‍यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.