औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’च व्हावा, पण नाव बदलण्याने काय साध्य होणार?

राज्यकर्ता म्हणून सर्वांगिण विकास व्हायलाच हवा, - अमोल कोल्हे

0

मुंबई : “औरंगाबाद या शहराचा उल्लेख संभाजीनगरच व्हायला हवा. पण राज्यकर्ता म्हणून सर्वांगिण विकास व्हायला हवा. आपली अस्मिता आणि प्रतिकेच्या मागे किती धावायचं, नाव बदलण्याने काय साध्य होणार आहे?

अस्मितेच्या प्रश्नाने मराठवाड्याचे प्रश्न थांबणार नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत”, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मांडली.  अमोल कोल्हे यांनी यावेळी विविध विषयांवर आपलं मत मांडलं. त्यांना मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारला असता “मराठा आरक्षणाचा विषय हा न्यायप्रविष्ट आहे. या विषयी सरकार सातत्याने भूमिका मांडतं आहे. एबीसी आरक्षणाबाबात संसदेत जनगणनेत वेगळा कॉलम असायला हवा. जोपर्यंत संख्या समजणार नाही तोपर्यंत काही ठरवता येणार नाही. सध्या 52 टक्के आरक्षणापैकी 27 टक्केच आरक्षण आहे, त्यामुळे जनगणना महत्वाची आहे”, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली.

बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा आज (10 नोव्हेंबर) निकाल जाहीर होणार आहे. याबबत कोल्हे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं. “तेजस्वी यादव यांनी 31 व्या वर्षी जे काम केलंय ते वाखाणण्याजोगं आहे. त्यांचं कौतुक करतो. अनेक तरुणांना त्यांनी राजकारण्यात येण्यासाठी प्रोत्साहीत केलं आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले. दरम्यान, बिहारमध्ये सध्या मतमोजनी सुरु आहे. या मतमोजनीचा निकाल आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत पूर्ण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजप सर्वाधक 75 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. तर भाजपचा मित्रपक्ष 42 जागांवर आघाडीवर आहे. आताच्या आकडेवारीनुसार भाजपप्रणित एनडीए बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होण्याची चिन्हं आहेत. मात्र, अजूनही संपूर्ण मतमोजनीचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत स्पष्टपणे काहीच सांगता येणार नाही.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.