शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्तालयावर हल्लाबोल

0

औरंगाबाद : शिवसेनेच्यावतीने २३ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी जिल्हाभरातील शेतकरी व शिवसैनिकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल निदर्शने करण्यात आले.

90 टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याचा दावा सरकार तसेच बँकांमार्फत केला जात आहे मात्र प्रत्यक्षात कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. सरकारच्या फसव्या घोषणा, फसवी कर्जमाफी, शेतकऱ्यांना बँकेची होणारी अडवणूक, कर्जमाफीवर होणारी व्याज माफी, पिक विमाचा घोटाळा,शेतसारा वसुली, जनावरांचा चारा प्रश्न अशा विविध मागण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल निदर्शने करण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, जयवंत ओक, राजू राठोड, गणेश चोपडे, जिल्हा परिषद गटनेता अविनाश पाटील गलांडे, महिला आघाडी संपर्कप्रमुख कला ओझा, सहसंपर्कप्रमुख सुनीता आऊलवार, जिल्हा संघटक आनंदी आनंदाते, रंजना कुलकर्णी, उपजिल्हा संघटक प्रतिभा जगताप, अंजली मांडवकर, सुनीता देव यांची प्रमुख उपस्थिती होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.