शिवसेनेची चारही बाजूने कोंडी, मनपा प्रशासनाचा कार्यक्रमावर बहिष्कार

0

औरंगाबाद : शिवसेना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी सकाळी स्मार्ट सिटी अंतर्गत येणा-या सिटी बस, शंभर कोटींच्या रस्त्याचे उद्धाटन, खासगी संस्थेकडून कचरा संकलनाचे काम आणि 161 एमएलडी क्षमतेच्या एसटीपी प्लँटचे लोकार्पण करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

या कार्यक्रमावर महानगरपालिका प्रशासनाने बहिष्कार टाकला आहे. यापूर्वी भाजपने शिवसेनेला दुर्लक्षित केले होते. त्यामुळे चारही बाजूने शिवसेनेची कोंडी होताना दिसत आहे. 23 डिसेंबर रोजी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या विविध कामांचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी दोन दिवसांपूर्वी जाहिर केले.आदित्य ठाकरे यांची वेळ घेतल्यानंतर महापौरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण घेण्यासाठी भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांना नकार देऊन 3 जानेवारीला येईल, असे सांगितले. त्यामुळे भाजप-शिवसेनेत बिनसल्याचे चित्र दिसत आहे. या वादात आता मनपा प्रशासनाने उडी टाकली आहे. मनपा आयुक्त डॉ. निपूण विनायक यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. ‘मुख्यमंत्री येणार नसतील तर मीही येणार नाही. कार्यक्रम पत्रिकेत माझे नावही टाकू नका.’ असे त्यांनी बजावले आहे.

तसेच दुसरीकडे या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे की नाही, याचा निर्णय अद्याप भाजपने  घेतला नसल्याचे कळते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.