लॅपटॉप आणि मोबाईल चोरी प्रकरणी दोघे जेरबंद

0

औरंगाबाद : औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या एमआयडीसी वाळूज पोलिसांनी लॅपटॉप आणि मोबाईल चोरी प्रकरणातील दोघा भामट्यांना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव शेणपुंजी येथील एकतानगर या भागातील चोरीचा लॅपटॉप विक्री करण्यासाठी ग्राहकाचा शोध घेत असल्याची माहिती गुप्तबातमीदारांमार्फत मंगळवारी एमआयडीसी वाळूज गुन्हे शाखेचे प्रमुख फौजदार राहुल रोडे यांना मिळाली होती. या खात्रीशीर माहितीवरून सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास छापा मारला असता, यावेळी पोलिसांनी संशयित इसमाची चौकशी केली. तसेच त्याच्या घराची झडती घेतली. या तपासात एका सुटकेसमध्ये चोरीचा लॅपटॉप मिळून आला. यावेळी पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली असता, त्याने सदर लॅपटॉप चोरीचा असल्याचे सांगितले. यावेळी १९ वर्षीय आरोपी किरण अशोक जाधव यास अटक करण्यात आली.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.