औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेतर्फे रविवारी गिरीभ्रमण मोहिमेचे आयोजन

गोगाबाबा टेकडी ते दौलताबाद किल्ला 12 किलोमीटर पायवाट रस्त्याने गिरिभ्रमण

0

औरंगाबाद : जिल्हा सायकल संघटनेतर्फे दरवर्षी गोगाबाबा टेकडी ते दौलताबाद किल्ला 12 किलोमीटर पायवाट रस्त्याने गिरिभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे.

जिल्हा सायकल संघटनेच्या वतीने रविवारी 9 ऑगस्ट 2020 रोजी गिरिभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 70 ते 80 सायकलपटू, क्रीडाप्रेमी भाग घेतात. या गिरीभ्रमण मोहीम दरम्यान निसर्गमय वातावरण अनेक जंगली प्राणी व पक्षी दऱ्याखोऱ्या डोंगर दर्शन घडते. मोहिमेची सुरुवात गोगाबाबा टेकडी, चिमणापूर वाडी, रसूलपुरा, दक्षिण हनुमान मंदिर, दौलताबाद किल्ला असा 12 किलोमीटर पायवाट रस्ता आहे. या गिरिभ्रमण मोहिममध्ये जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष निखिल कचेश्वर सचिव चरणजित सिंग संघा यांनी केले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.