अवैध गर्भपात करून अर्भकाच्या विल्हेवाटीसाठी रुग्णांच्या बेड खालीच चेंबर, डॉ. वर्षा राजपूतला अटक

0

औरंगाबाद : शहरात अवैध गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणा-या डॉक्टरांच्या टोळीला 22 जानेवारी रोजी अटक केल्यानंतर मंगळवारी त्यातील डॉ वर्षा राजपूत (शेवगण) यांच्या सिडको एन-2 येथील विमल माता बालरुग्णालयाची झडती घेण्यात आली.

या तपासात मनपा व पोलिस पथकाला रुग्णांच्या वॉर्डात प्रत्येक बेड खालीच एक चेंबर आढळून आले. पथकाने हे चेंबर व ड्रेनेजलाईन जेसीबीने खोदले. यावेळी तसाला संशयास्पद आढळलेली माती आणि इतर साहित्याचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

यापूर्वी गर्भलिंग निदान करणारे डॉ. सूरज सूर्यकांत राणा याच्यासह 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या टोळीतील डॉ. वर्षा राजपूत हिला सिल्लोड येथून अटक केली आहे.

डॉ. वर्षा राजपूत हिचेच हे विमल मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटल असून तेथे अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात करून अर्भकाची विल्हेवाट लावली जात होती, असे तपासात समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार मनपा आरोग्य विभागाच्या डॉ नीता पाडळकर यांनी सहायक पोलीस निरिक्षक श्रद्धा वायदंडे यांच्या टीमसह जालना रस्त्यावरील या दवाखान्याची झडती घेतली.

याबाबत पोलीस निरिक्षक श्रद्धा वायदंडे म्हणाल्या, आतापर्यंत अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान तसेच विल्हेवाट प्रकरणात 9 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात चार डॉक्टर आणि महिलेची तीन नातेवाईक आणि एक लॅब टेक्निशिअन आहेत. या कारवाईसाठी गुप्तता बाळगली जात आहे. शहरात अजून बहुतांश ठिकाणी शोधमोहिम राबविण्यात येणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.