जन्मदात्या आईच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

बीडमधील या घटनेने सर्वत्र उडाली खळबळ, केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0

बीड : बी़ड येथील मुलांनी आपल्या जन्मदात्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना बीडमधील केज येथील कानडी माळी या गावात घडली. पीएफच्या पैशांसाठी मुलाने आपल्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला.

बीडमधील केज येथील कानडी माळी या गावात घडली. पीएफच्या पैशांसाठी मुलाने आपल्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला. इंदुबाई कुचेकर यांचे पती पोलिस सेवेत होते. काही वर्षांपूर्वी ते बेपत्ता झाले. शोध न लागल्याने त्यांना मयत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्चात इंदुबाई कुचेकर यांना पीएफचे नऊ लाख रुपये मिळाले. मात्र ही रक्कम आपल्याला मिळावी. यासाठी त्यांच्या दोन्ही मुलांनी तगादा लावला होता. या मिळालेल्या पैशांमधील काही रक्कम मुलांना देऊन देखील, उर्वरित रक्कम मिळावी. यासाठी मुलांनी आपल्या जन्मदात्या आईच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर इंदुबाई यांच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, बीडमधील या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. जन्मदात्या मुलांनीच आपल्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याने सर्वच स्तरांतून या मुलांवर संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.