राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या…!

महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा जरे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार. हल्ल्यात गंभीररित्या जखमी

0

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरेयांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची खळबळ जनक घटना घडली नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाट्याजवळ (ता.पारनेर) सोमवारी(३० नोव्हें.)रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाट्याजवळ (ता.पारनेर) सोमवारी(३० नोव्हें.)रात्री आठ वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षारेखा भाऊसाहेब जरेयांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक  ही घटना घडली. जरे या सोमवारी कामानिमित्त पुणे येथे गेल्या होत्या. पुणे येथून कारने नगरकडे येत असताना जातेगाव फाटा नजीक मोटरसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांना अडविले. यावेळी एकाने जरे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या जरे यांना काही वेळातच नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनेबाबत माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली तसेच आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.