डांबरीकरण एकदाच या रस्त्याच्या वाट्याला, व्यवस्थेच्या चिखलात फसला ट्रक

सिरपूर-केरवाडी रस्ता ; महिन्यातील ही दुसरी घटना

0

पालम : सिरपूर ते केरवाडी दरम्यानच्या रस्त्यावर व्यवस्थेचा चिखल तुडवित विद्यार्थी शाळा पोहोचत आहेत. याच चिखलात २ ऑक्टोबर 2020 रोजी सिरपूर येथे येणारा सिमेंटचा ट्रक फसला.  ही महिन्यातील दुसरी घटना असून हा असा आता प्रकार सिरपूरवासियांसाठी नित्याचीच झाली आहे.

सिरपूर ते केरवाडी दरम्यानच्या रस्त्यावर व्यवस्थेचा चिखल तुडवित विद्यार्थी शाळा पोहोचत आहेत. याच चिखलात २ ऑक्टोबर 2020 रोजी सिरपूर येथे येणारा सिमेंटचा ट्रक फसला.  ही महिन्यातील दुसरी घटना आहे. स्वातंत्र्यानंतर फक्त एकाच वेळेी डांबरीकरण या रस्त्याच्या वाट्याला आले. त्यालाही पंधरा वर्षांहून अधिक काळ लोटला. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, हेच आता नागरिकांना समजेना. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे, अशा रस्त्यातून सिरपूरच्या विद्यार्थ्यांना केरवाडी येथील शाळे पोहोचावे लागते हे दुर्दैवच. पावसाळ्यात रस्त्यावरून पायी चालतादेखील येत नाही. थोडा जरी पाऊस पडला तरी वाहने चिखलात फसत आहेत. असाच एक सिमेंटचा ट्रक सिरपूर गावालगत फसला.  त्यातील माल खाली उतरल्याशिवाय ट्रक जाग्यावरून हलणार नाही. म्हणजेच रस्त्यावर डांबर राहिलेच नाही. दुचाकीवरून तर रस्त्यावरून चालवताच येत नाही.  पावसाळ्यात शेतमाल पालम येथे नेता येत नाही, खत बियाणेदेखील गावात आणता येत नाही. यामुळे वाहने आवक- जावकचा  हा प्रश्न एकट्या सिरपूरचा नसून त्या परिसरातील सायळ, उमरथडी, खुर्लेवाडी, धनेवाडी आदी गावांचा आहे. तरीही बांधकाम विभाग किंवा लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून ते लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत नेत्यांनी रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. परंतु निवडणूक आटोपल्यानंतर नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे ग्रामस्थ वैतागले आहेत. दाद मागावी तरी कोणाकडे ? असा यक्षप्रश्न ग्रामस्थांना पडला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.