लातूरच्या अस्मिता माधव गोरेने ‘केबीसी’त जिंकले…, 12 लाख 50 हजार रुपये

महाराष्ट्राच्या या लेकीची जिद्द अवघ्या देशभरासाठी ठरली प्रेरणादायी

0

मुंबई : लातूरच्या अस्मिता माधव गोरेने  आई-वडिलांच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्याची जिद्द मनाशी बाळगून  ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये  सहभागी झाली आणि   12 लाख 50 हजार रुपये जिंकले. त्यामुळे ऑपरेशन आणि बहीण-भावांचे शिक्षण पूर्ण करण्याचे तिचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अस्मिताच्या संघर्षमय प्रवासाने कोरोनावर मात करून आलेले महानायक अमिताभ बच्चन देखील भावूक झालेले दिसले.

लातूरच्या अस्मिता माधव गोरेने  आई-वडिलांच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्याची जिद्द मनाशी बाळगून  ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये  सहभागी झाली आणि   12 लाख 50 हजार रुपये जिंकले. अमिताभ बच्चन यांनी शोमध्ये अस्मिताला 25 लाख रुपयांचा प्रश्न विचारला. त्याचे उत्तर अस्मिता देऊ शकली नाही. त्यामुळे तिने तेथेच खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. यासह ती 12 लाख 50 हजार रुपये घेऊन घरी परतणार आहे. या पैशातून वडिलांची शस्त्रक्रिया आणि भावा-बहिणींचे शिक्षण करण्याची तिची इच्छा आहे. अमिताभ बच्चन यांनी विचारलेला 25 लाख रुपयांचा प्रश्न. 1905 मध्ये बंगालच्या विभाजनाविरोधात नागरिकांमध्ये  एकता दाखवण्यासाठी यापैकी कोणता दिवस विशेष पद्धतीने साजरा करण्यात आला होता? A- दसरा, B- रक्षाबंधन, C- ईद, D- ईस्टर संडे. या प्रश्नाचं उत्तर रक्षाबंधन होते. या अगोदर 6 ऑक्टोबरच्या भागात स्पर्धक सविता रेड्डी यांनी 12 लाख 60 हजार जिंकल्यानंतर खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ‘हॉटसीट’वर आलेल्या राजस्थानच्या रघुराम यांनी केवळ 6 लाख 40 हजार रुपयांवर हा खेळ थांबवला. या दोन स्पर्धकांनंतर या खुर्चीत लातूरची  अस्मिता माधव गोरे विराजमान झाली होती. अस्मिताचा केबीसीपर्यंतचा प्रवास पाहून खुद्द अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यातही पाणी आले होते .

हॉटसीटवर विराजमान होणाऱ्या स्पर्धकाची ओळख एका एव्हीमधून करून दिली जाते. लातूरमध्ये  राहणारी अस्मिता माधव गोरे , वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी या खुर्चीत विराजमान झाली आहे. तिचा हा प्रवास अत्यंत खडतर होता. तिच्या या प्रवासाची झलक दाखवणारा व्हिडीओ पाहून अमिताभ बच्चन यांच्यासह, सेटवर उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले. आपल्या बुद्धीची चुणूक दाखवत हॉटसीटवर विराजमान झालेली अस्मिता  केवळ 22 वर्षांची आहे. इतक्या लहान वयात ती आपल्या कुटुंबासाठी मेहनत करत आहे. अस्मिताचे वडील अंध असून, आईदेखील एकाच डोळ्याने पाहू शकते. अस्मिताच्या प्रगतीबद्दल तिची आई, वडिलांना सगळ्या गोष्टी सांगते. जणू काही तिचे वडील आईच्या एका डोळ्यातूनच अस्मिताला पाहतात. अस्मिताला विदेशात जाऊन तिच्या आई-वडिलांची दृष्टी परत यावी म्हणून शस्त्रक्रिया करायची आहे. आई-वडिलांना आपण कसे दिसतो, काय करतो हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहता यावे, म्हणून अस्मिताची धडपड सुरू आहे. नेत्रहीन असलेले माधव गोरे कायमच लेकीलाच्या मागे भक्कम आधार बनून उभे राहिले आहेत. अस्मिताच्या ‘केबीसी’  प्रवासातही ते तिच्या सोबत आले होते. अस्मिताची जिद्द आणि तिच्या वडिलांचा पाठिंबा यासह ‘केबीसी’च्या खेळाला सुरुवात झाली. अमिताभ बच्चन यांनी अस्मिताला सलाम करत, शुभेच्छा दिल्या.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.