रायगडावर ‘अशी’ रोषणाई अपमानास्पद; संभाजीराजे भडकले

शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावरील रोषणाईवर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, खासदार संभाजीराजे यांची तीव्र नाराजी

0

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेऊन शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याची तयारी करण्यात आली आहे.
शिवजयंती सोहळ्यासाठी स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगडही सज्ज झाला आहे. मात्र, रायगडावर करण्यात आलेल्या रोषणाईवर खासदार संभाजीराजे भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही रोषणाई विचित्र आणि अपमानजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संभाजीराजे यांनी या संदर्भात एक ट्वीट केले आहे. ‘भारतीय पुरातत्त्व विभागाने, आजच्या शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून गणला जाईल,’ असे संभाजीराजे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. ‘पुरातत्व खात्याचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबिरंगी प्रकाशयोजना केल्यामुळे हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो,’ असेही त्यांनी नमूद केले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.