नोकरी गेली म्हणून उसनवारीने थाटले कपड्याचे दुकान, चोरट्यांनी रात्रीतून सर्व माल लंपास

दिवाळीत दिवाळे : दुकानाच्या मागील बाजूचे पत्रे उचकटून गाडीत नेले कपडे भरून

0

औरंगाबाद :  दौलताबाद  येथील औरंगाबाद- शिर्डी मार्गावरील आसेगाव फाटा येथील ही घटना आहे. पंकज गुलाबराव थोरात (२५ रा. आंबेगाव) असे दुकान मालकाचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .

दौलताबाद  येथील औरंगाबाद- शिर्डी मार्गावरील आसेगाव फाटा येथील ही घटना. पंकज गुलाबराव थोरात (२५ रा. आंबेगाव) असे दुकान मालकाचे नाव आहे. लॉकडाऊनमुळे कंपनीतील नोकरी गेली. स्वत:ची जमापुंजी, नातेवाईक आणि मित्रांकडून भांडवल उभे केले. रेडिमेड कपड्यांचे दुकान टाकले. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दिवाळीत चांगला व्यवसाय होईल ही अपेक्षा होती. मात्र, दुर्दैव असे दिवाळीचा सीझन सुरू असतानाच रात्री चोरट्यांनी दुकानात चोरी केली आणि अक्षरश: संपूर्ण दुकान साफ केले.  याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. समर्थ कलेक्शन असे पंकजच्या दुकानाचे नाव आहे. तो आधी वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत होता. मात्र, लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्यानंतर त्याने हा व्यवसाय सुरू केला. पंकजचे वडील शेतकरी आहेत. गुरुवारी दिवसभर व्यवसाय करून पंकज हा नेहमी प्रमाणे दुकान बंद करून रात्री घरी गेला. गुरुवारी धनत्रयोदशीच्या सकाळी पंकज थोरात याने दुकान उघडले आणि तर सर्व रॅक रिकामे दिसून अाले. हा प्रकार पाहून त्याच्या पायाखालची वाळू सरकली. ४ ऑक्टोबर रोजी गुलाबराव थोरात यांनी दुकानाचे उद्घाटन केले. महिनाभरात पंकजही व्यवसाय शिकत होता, त्यातच हा प्रकार घडला. चोरट्यांनी दुकानातील लाखो रुपयांचा माल चोरून नेला. यात साड्या, रेडिमेड कपडे जीन्स, ड्रेस मटेरियल होते. पोलिस उपनिरीक्षक रवी कदम यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पंकजचे दुकान रस्त्याला लागून आहे. पाठीमागे ओसाड जमीन आहे. रस्त्याच्या एका बाजूला कंपाउंड आहे. त्यामुळे रस्त्यावरून दुकानाच्या पाठीमागचे काहीच दिसत नाही. चोरटे दुकानाच्या पाठीमागचे पत्रे उचकटवत आत घुसले आणि त्यांनी चोरी केली. कपड्याची संख्या पाहता हा सर्व माल नेण्यासाठी त्यांनी चारचाकी वाहनाचा उपयोग केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.