भावासाठी अर्पिताने लिहिली भावूक पोस्ट, सलमाननेही भावनांना वाट मोकळी केली

0

सुपरस्टार सलमान खानने तुरुंगातून सुटका झाल्यानंतर एक भावूक पोस्ट केली आहे. त्यानंतर बहिण अर्पिता खाननेदेखील भावासाठी एक पोस्ट टाकली आहे. काळवीट शिकार प्रकरणात सलमानने जोधपूर मध्यवर्ती कारागृहात 50 तास काढले. त्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर होताच सलमान मुंबईला रवाना झाला होता.

चाहत्यांनी सलमानची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर मोठी गर्दी केली होती. मात्र त्याने या काळात कशावरही बोलण्यास नकार दिला होता. अखेर त्याने टि्वट करून आपल्या भावनांना वाट मोकळी केली.

अर्पिताने सलमानसाठी पोस्ट लिहून म्हटले, की ‘माझी ताकद, माझा गर्व, माझा आनंद, माझ आयुष्य, माझ जग सर्वकाही तूच आहेस. तुझ्या आयुष्यातील सर्व दु:ख दूर व्हावे आणि तू नेहमी आनंदी राहावा. तुझ्या आयुष्यात तू आणखी यशस्वी व्हावे.’

सलमानचे टि्वट –

सलमानने त्याच्या टि्वटमध्ये चाहत्यांचे आभार मानले. त्याने टि्वटमध्ये लिहिले, ‘कृतज्ञेतेचे अश्रू, त्या सर्व लोकांचे आभार मानतो, जे माझ्यासोबत होते आणि ज्यांनी मूळीच आशा सोडली नाही. तुमच्याकडून मिळालेल्या पाठिंबा आणि प्रेमासाठी खूप धन्यवाद…’

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.