अर्णव गोस्वामींचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळला

मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखलचे दिले निर्देश

0

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अटकेत असलेले पत्रकार अर्णव गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता अर्णव यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार असून सत्र न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना तळोजा तुरुंगातच राहावे लागणार आहे.

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अटकेत असलेले पत्रकार अर्णव गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले. अर्णव गोस्वामी यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने एफआयआर रद्द करण्यासाठी आणि जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तीन दिवस त्यावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर आज न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावत अर्णव यांना जामीन देण्यास नकार दिला. हे एक्सट्रा ऑर्डिनरी प्रकरण नाही. त्यामुळे जामिनासाठी ज्या प्रचलित यंत्रणा आणि पद्धती आहे. त्यानुसारच अर्ज करून जामीन घेण्यात यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात जामीन दिल्यास ही प्रथा पडून जाईल आणि कोणीही उठसूठ उच्च न्यायालयात येऊन जामिनासाठी अर्ज करेल, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले. तसेच जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देशही कोर्टाकडून देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या या स्पष्ट निर्देशामुळे आता अर्णव यांच्या वकिलांना जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर त्यावर सत्र न्यायालय निर्णय देईल. तोपर्यंत अर्णव यांना तळोजा तुरुंगातच राहावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.