अर्णव गोस्वामी यांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी

पोलिस व्हॅनमधून 'अर्णव गोस्वामींनी पुलीस कोर्ट मे हार चुकी है....' दिल्या घोषणा

0

अलिबाग: ‘रिपब्लिक वृत्तवाहिनी’चे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ही माहिती दिली. अर्णव गोस्वामी यांना पोलिस कोठडी देण्याची ठाकरे सरकारची मागणी न्यायालयाने फेटाळली. अर्णव गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

आज मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल. अर्णव गोस्वामी यांना न्याय नक्की मिळेल, असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला. या प्रकरणातील अन्य आरोपी फिरोज शेख आणि नितेश सारडा यांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अलिबाग न्यायालयाच्या निकालानंतर प्रसारमाध्यमांसमोर अर्णव गोस्वामी यांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी केली. अर्णव गोस्वामी यांनी पोलीस व्हॅनमधून जाताना ‘पुलीस कोर्ट मे हार चुकी है… पुलीस कोर्ट मे हार चुकी है…’ अशा  घोषणा दिल्या. त्यामुळे आता आज अर्णव गोस्वामी यांना जामीन मिळवून देण्यासाठी काय हालचाली व कायदेशीर डावपेच पाहायला मिळणार, याविषयीची उत्सुकता वाढली आहे. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णव गोस्वामी यांना आज सकाळी मुंबई आणि रायगड पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली होती. यानंतर अर्णव गोस्वामी यांना अलिबाग येथे आणून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हापासून अर्णव यांच्या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. यादरम्यान अर्णव गोस्वामी यांना रुग्णालयात नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.