उच्च न्यायालयाकडूनही अर्णब गोस्वामींना दिलासा नाही, उद्या पुन्हा सुनावणी

अर्णब गोस्वामींचा मुक्काम सलग दुसऱ्या रात्री अलिबाग कारागृहाच्या कोविड विलगीकरण वॉर्डातच

0

मुंबई : अर्णब गोस्वामींना तातडीचा कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राज्य सरकारने यावर उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतला. त्यामुळे युक्तिवाद ऐकण्यास असमर्थ असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांचा मुक्काम सलग दुस-या रात्री अलिबाग कारागृहाच्या कोविड विलगीकरण वॉर्डात असणार आहे.

अलिबाग सत्र न्यायालयात रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जावर 7 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान अर्णब गोस्वामीने अलिबाग दंडाधिकारी कोर्टातील जामीन अर्ज मागे घेतला आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक यांनी साल 2018 मध्ये आत्महत्या केली होती. या आत्महत्येला जबाबदार असल्याच्या आरोपाखाली अर्णब गोस्वामी यांनी बुधवारी (4 नोव्हेंबर) रायगड पोलिसांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अलिबाग दंडाधिकारी  न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी पोलिसांनी आधीच आपला ‘ए’ समरी अहवाल दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा आरोपीच्या कोठडीची गरज नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. बुधवारी रात्री बराच उशिर झाल्याने अर्णबसह या प्रकरणातील तीन आरोपींच्या जामीन अर्जावर गुरूवारी सुनावणी होणे अपेक्षित होते. मात्र रायगड पोलिसांनी यावर उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागून घेतला. तसेच पोलिस कोठडी नाकारण्याच्या दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाला अलिबाग सत्र न्यायालयात आव्हान देण्याचीही तयारी करून ठेवली. जेणेकरून कायदेशीर बाबींत उपलब्ध असलेला कुठलाही पर्याय शिल्लक राहू नये.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.