‘अर्णब गोस्वामी हा भाजपचा लाऊड स्पीकर’!

आपल्या कार्यकर्त्याने नेमका काय गुन्हा केला आहे, हे एकदा समजून घ्या'- खासदार संजय राऊत

0

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी  रिपब्लिक टीव्हीचे  संपादक अर्णब गोस्वामी  यांना अटक केल्यामुळे भाजपने  राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. पण, ‘अर्णब गोस्वामी हे भाजपचे कार्यकर्ते आहे, आपल्या कार्यकर्त्याने नेमका काय गुन्हा केला आहे, हे एकदा समजून घ्या’, असा सल्ला वजा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लगावला. तसेच, ‘अर्णब गोस्वामी हा भाजपचा लाऊड स्पीकर आहे’ असेही ते म्हणाले.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी  रिपब्लिक टीव्हीचे  संपादक अर्णब गोस्वामी  यांना अटक केल्यामुळे भाजपने  राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. पण, ‘अर्णब गोस्वामी हे भाजपचे कार्यकर्ते आहे, आपल्या कार्यकर्त्याने नेमका काय गुन्हा केला आहे, हे एकदा समजून घ्या’, असा सल्ला वजा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लगावला. ‘भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांनी एकत्र येऊन अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली पाहिजे, त्याचे अश्रू पुसले पाहिजे’.  संजय राऊत यांनी अर्णब गोस्वामी अटक प्रकरणावरून भाजपला खडसावले. अर्णब गोस्वामी हा भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते हे देशभरात रस्त्यावर उतरले आहे. कदाचित हा त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम असेल तर त्यांनी तो करावा. अन्वय नाईक यांच्या मुलीने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यांच्या मुलीची पत्रकार परिषद ऐकून जर भाजप नेत्याला पाझर फुटला नसेल तर मानवतावाद, न्याय या शब्दांचा वापर करू नये’ असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.