अर्णबने मुंबई उच्च न्यायालयात केला जामिन अर्ज

आज सुनावणीची शक्यता. 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत अर्णब गोस्वामी

0

अलिबाग :’रिपब्लिक  वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामीला रायगडच्या स्थानिक न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीतपाठवले. म्हणजेच अर्णबला 18 नोव्हेंबरपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. दरम्यान बुधवारी त्यांना तुरुंगात शिफ्ट केले जाऊ शकत नाही. अर्णबने रात्र शाळेत घालवली, जेथे अलिबाग स्टेशनमध्ये बंद आरोपींसाठी कोविड सेंटर बनवण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांनी अर्णबला बुधवारी सकाळी त्याच्या घरातून अटक केली होती. अर्णबने मुंबई उच्च न्यायालयात जामिन अर्ज केला आहे. यावर आज सुनावणी होऊ शकते. अर्णबचे वकील पोंडा म्हणाले की, उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाब मागितला आहे. मुंबईमध्ये इंडीरियर डिझायनर अन्वय नाइक आणि त्यांच्या आई कुमुद यांनी मे 2018 मध्ये आत्महत्या केली होती. सुसाइड नोटमध्ये अर्णबसह तीन लोकांवर आरोप लावण्यात आले होते. सुसाइड नोटनुसार अर्णब आणि दुसऱ्या आरोपींनी नाइक यांना वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी डिझायनर ठेवले होते, मात्र जवळपास 5.40 कोटी रुपयांचे पेमेंट केले नाही. यामुळे अन्वय यांची आर्थिक परिस्थिती बिघडली आणि त्यांनी आत्महत्या केली. अन्वय यांच्या पत्नी अक्षता यांनी अर्णबच्या अटकेनंतर म्हटले की, ‘2018 नंतर दोन वर्षे कारवाई का करण्यात आली नाही हे मला माहिती नाही. मी माझा नवरा गमावला आहे. जर त्यांना अर्णब आणि इतर दोन आरोपींकडून पैसे मिळाले असते तर आज माझा नवरा आणि सासू जिवंत असते. सुशांत प्रकरणात तर सुसाइड नोटही नव्हती, तरीही तपास झाला, मात्र माझ्या नवऱ्याच्या प्रकरणात सुसाइड नोटही आहे. महाराष्ट्र पोलिसांनी आता जी कारवाई केली आहे, त्यानंतर आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.’ अर्णबच्या अटकेच्या 12 तासांमध्येच त्याच्या विरोधात दुसरा केस दाखल करण्यात आला. मुंबईचे एनएम जोशी पोलिस स्टेशनमध्ये कलम 353 नुसार गन्हा दाखल करण्यात आला. न्यूज एजेंसी एएनआयनुसार अर्णबवर महिला पोलिसाला मारहाण करण्याचा आरोप आहे. असे बोलले जात आहे की, पोलिस जेव्हा अर्णबला अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.