सुधीर मुनगंटीवारांची विधिमंडळाच्‍या लोकलेखा समितीच्‍या अध्‍यक्षपदी निुयक्ती

या नवीन पदासाठी सर्व स्तरांतून मुनगंटीवार यांचे अभिनंदन!

0

चंद्रपूर : महाराष्‍ट्र विधिमंडळाच्‍या लोकलेखा समितीच्‍या अध्‍यक्षपदी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. लोकलेखा समिती ही महाराष्‍ट्र विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्‍त समिती आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अध्यक्षतेखाली गठीत या लोकलेखा समितीच्‍या सदस्‍यपदी माजी मुख्‍यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा माजी कृषीमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील, माजी शालेय शिक्षण मंत्री अॅड. आशिष शेलार, माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री विनय कोरे, माजी राज्‍यमंत्री संजय सावकारे आदींचा समावेश असणार आहे.

लोकलेखा समिती ही महाराष्‍ट्र विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्‍त समिती आहे. यामध्ये राज्‍याचे विनियोजन लेखे आणि नियंत्रक तसेच महालेखापरीक्षक यांचा अहवाल, त्याचे परिनिरीक्षण करणे, राज्‍य शासनाच्‍या वित्‍तीय लेख्‍यांचे आणि त्यावरील लेखापरीक्षा अहवालाचे परिनिरीक्षण करणे अशी कामे येतात. इतकेच नाही तर यामध्ये राज्‍याची महामंडळे, व्‍यापार विषयक व उत्‍पादन विषयक योजना, प्रकल्‍प यांचे उत्‍पन्‍न आणि खर्च दाखवणारा लेखा विवरणे तसेच एखादे विशिष्ट महामंडळ, व्‍यापारी संस्‍था किंवा प्रकल्‍प यांना भांडवल पुरवण्‍यासंदर्भात नियमन करणाऱ्या वैधानिक नियमांच्‍या तरतूदी अन्‍वये तयार केलेला करणे. यामध्ये ताळेबंद व नफा तोट्याच्‍या लेख्‍यांची विवरणे, त्‍यावरील नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांचा अहवाल तपासणे, राज्‍यपालांनी कोणत्‍याही जमा रकमांची लेखा परीक्षा करण्‍याबाबत किंवा साठा व मालासंबंधीचे लेखे तपासण्‍याबाबत नियंत्रक व महालेखापरिक्षक यांना निर्देशीत असेल त्‍याबाबतीत त्‍यांच्‍या अहवालाचा परीक्षण करणे ही लोकलेखा समितीची प्रमुख कर्तव्‍ये आहेत. यामुळे आता मुनगंटीवार यांच्यावर अनेक नव्या जबाबदाऱ्या असणार आहेत. या नव्या पदासाठी सर्व स्तरांतून मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले जात आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांंआधी सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या कुटुंबातीलही काहीजण कोरोना पॉझिटिव्ह होते. पण आता त्यांची प्रकृती ठीक असून कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर मात करत त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.