‘एआयसीटीई’च्या अभ्यासक्रम समितीवर डॉ.रत्नदीप देशमुख यांची नियुक्ती

विद्यापीठातील 'संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान' विभाग, प्राध्यापक डॉ. रत्नदीप देशमुख

0

औरंगाबाद : अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषदेच्या वतीने अखिल भारतीय माहिती-तंत्रज्ञान शिक्षण मंडळाच्या अंतर्गत अभ्यासक्रम रचना समितीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान’ विभागातील प्राध्यापक डॉ.रत्नदीप देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान’ विभाग प्राध्यापक डॉ.रत्नदीप देशमुख यांना अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषदेच्या वतीने अखिल भारतीय माहिती-तंत्रज्ञान शिक्षण मंडळांर्गत अभ्यासक्रम रचना समितीवर नियुक्त करण्यात आले आहे. या समिती अंतर्गत एमसीए या तीन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पुनर्विलोकन करणे व नव्याने दोन वर्षांचा अखिल भारतीय स्तरावर प्रारुप आराखडा आणि तपशीलवार अभ्यासक्रम बनवण्यासाठी खालील सदस्यांची समिती गठीत करण्यात आली. या समितीचे संयोजक डॉ.भारत भास्कर, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट रायपूर हे असणार आहेत. तसेच डॉ.सुदेष्णा सरकार, डॉ.मनीष अरोरा प्रा.कर्मेषु, प्रा.रविंद्र वैद्य, प्रा.पी.व्ही.सुरेश व प्रा.उज्ज्वल लांजेवार, प्रा.डी.के.लोबियाल, प्रा.पी.एस.ग्रोवर व प्रा.एम.सुंदरसेन, प्रा.एस.सुरेश हे या समितीचे सदस्य आहेत.डॉ.रत्नदीप देशमुख हे संगणकशास्त्र विभागात प्राध्यापक असून विभागप्रमुख, अधिसभा, व्यवस्थापन परिषदेवर त्यांनी काम पाहिले आहे. संगणकशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, वि़द्या परिषद सदस्यपदी ते कार्यरत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.