पोलिस बॉईज असोसिएशनतर्फे महिला आघाडीची कार्यकारिणी नियुक्त

गंगापूर महिला तालुकाध्यक्षपदी सुरेखा गायकवाड तर लासूर शहराध्यक्षपदी उषाताई पवार

0

गंगापूर  : गंगापूर  तालुक्यातील लासूर स्टेशन येथे पोलिस बाँईज असोसिएशन महिला आघाडीच्यावतीने  कार्यकारिणी नियुक्त करण्यात  आली.  लासूर स्टेशन १७ सप्टेंबर रोजी लासूर येथे महाराष्ट्र पोलिस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रवी वैद्य, वाहतूक सेनेचे ज्ञानोबा धुमाळ, अरूण दाभाडे, अरूण सदाशिवे, सागर बनसोड याच्या प्रमुख उपस्थितीत महिलांना नियुक्ती पत्र देण्यात  आले.
लासूर येथे महाराष्ट्र पोलिस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रवी वैद्य, वाहतूक सेनेचे ज्ञानोबा धुमाळ, अरूण दाभाडे, अरूण सदाशिवे, सागर बनसोड यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांना नियुक्ती पत्र   देण्यात आले. यावेळी पोलिस बॉईज असोसिएशनच्या  गंगापूर महिला तालुकाध्यक्षपदी सुरेखा गायकवाड तर लासूर शहराध्यक्षपदी उषाताई पवार, उपाध्यक्षपदी जमीला पठाण, लासूर सर्कल अध्यक्षपदी कल्पना पवार यांची नियुक्ती करण्यात आली तसेच तालुका संघटकपदी अशोक बोरकर, लासूर सर्कल अध्यक्षपदी योगेश निकम यांची नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीबद्दल शिल्लेगाव ठाण्याचे पोलिस निरीक्षक सखाराम बाराहाते, प्रभारी पोलिस निरीक्षक रवी खांडेकर, सहाय्यक पो.नि.सतीश दिंडे, पत्रकार अशोक सोनवणे, प्रतिनिधी अनिरूध्द भारद्वाज को, बीट अमलदार नरके, पोलिस कैलास राठोड, शिवनाथ गायकवाड, माजिद पठाण यांनी निवडीचे स्वागत  करून अभिनंदन  केले. आणि   भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.