भारतीय दलित पँथरच्या राज्यव्यापी अधिवेशनात मोठ्या संख्येने सामीलचे आवाहन – ॲड. रमेश खंडागळे
औरंगाबाद येथे 23 फेब्रुवारी ला भारतीय दलित पॅंथरचे राज्यव्यापी अधिवेशन
औरंगाबाद : वाळूजमहानगर – वाळूज येथे भारतीय दलित पॅंथरच्या वतीने कॉर्नर बैठकीचे आयोजन १४ फेब्रुवारी रोजी केले होते. औरंगाबाद येथे 23 फेब्रुवारी ला भारतीय दलित पॅंथरचे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. या निमित्ताने झालेल्या कॉर्नर बैठकीतून या अधिवेशनात मोठ्या संख्येने सामील व्हा , असे आवाहन संयोजक ॲड. रमेश खंडागळे यांनी जनतेला केले आहे.
औरंगाबाद येथे 23 फेब्रुवारी ला भारतीय दलित पॅंथरचे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. या निमित्ताने झालेल्या कॉर्नर बैठकीतून या अधिवेशनात मोठ्या संख्येने सामील व्हा , असे आवाहन संयोजक ॲड. रमेश खंडागळे यांनी जनतेला केले आहे. बैठकीची सुरुवातीस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रमुख मार्गदर्शक ॲड. रमेश खंडागळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून व अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी गणेश चव्हाण होते. या बैठकीस सुभाष पठारे, सुनील लिंबोरे ,रमेश पवार ,अण्णासाहेब सभादिंडे, महेश नरोडे ,योगेश संकपाळ ,भैय्या चव्हाण, राजू बनकर, धोंडीराम पंडित ,प्रभाकर बावस्कर ,रवी जाधव ,शिवाजी पाचरणे, किरण श्रीखंडे, अमोल श्रीखंडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह अनेकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सिद्धार्थ नरवडे यांनी केले तर उपस्थितांचे गोरख हिवाळे यांनी आभार मानले.