लासूर स्टेशन येथे अप्पासाहेब वांजरे यांचा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्तीबद्दल सत्कार
अखिल भारतीय जन रक्षा आंदोलन महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष आगलावे यांच्या हस्ते सत्कार
औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे अप्पासाहेब वांजरे यांची महाराष्ट्राच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला.अखिल भारतीय जन रक्षा आंदोलन महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष बाळासाहेब जी. आगलावे यांनी अप्पासाहेब वंजारे यांनी वीस वर्षांपासून वृत्तपत्राच्या माध्यमातून शैक्षणिक. सामाजिक. आर्थिक पिळवणूक आणि अन्याय पीडित महिलांस लिखाणाच्या माध्यामातून न्याय मिळवुन देण्याचे काम केले आहे.
महापुरुषांचे विचार प्रबोधनाच्या माध्यमातून जण सामान्यात रुजवण्याचे काम अप्पासाहेब वांजरे यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय जण रक्षा आंदोलन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आगलावे यांनी आप्पासाहेब वंजारे यांची महाराष्ट्राच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे.संघटनेने दिलेली जबाबदारी मी इमाने-इतबारे पार पाडेल जनसामान्यांना अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे काम मी करेल, माझ्या कार्याची दखल घेऊन मला महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिवपदी नियुक्ती दिल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब जी आगलावे, प्रदेशाध्यक्ष गोविंद गायकवाड, कार्याध्यक्ष नामदेव साळवे, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सौ रेश्मा पोकळे, अल्पसंख्यांक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष युनूस पठाण यांचे आभार मानले. सर्वांना सोबत घेऊन समान न्याय मिळवून देण्याचे काम करेल, असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी लासूर स्टेशन येथे सत्कारप्रसंगी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल दैनिक शासन सम्राटचे संपादक किशोर महाजन लासूर स्टेशन मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महमूद भारतवाला, पत्रकार अनिरुद्ध भारद्वाज, सुभाष थोरात, मकसूदभाई, अविनाश संगेकर सर्व पत्रकार बंधू पोलिस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्तू पाटील तालुकाअध्यक्ष मिलिंद वंजारे महिंद्र वंजारे मौलाना शहा संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन तायडे सर्वानी अभिनंदन केले