अनुष्का-विराटच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर झाला व्हायरल? पण हे….

सोशल मीडियावर झाला व्हायरल? चौकशीत समोर आले सत्य

0

 मुंबई  : काय होते व्हायरल : सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये जो फोटो व्हायरल होतो आहे, तो अनुष्का आणि तिच्या नवजात बाळाचा असल्याचे म्हटले जात आहे. या पोस्टला 950 हून अधिक लोकांनी लाइक केले असून 100 हून अधिक लोकांनी त्यावर कमेंट दिल्या.

आणि सत्य काय आहे?

या पोस्टचे सत्य शोधण्यासाठी आम्ही व्हायरल होत असलेल्या फोटोला गुगलवर रिव्हर्स सर्च केले. सर्च रिझल्टमध्ये आम्हाला हा फोटो कॅची न्यूज वर्ल्ड नावाच्या वेबसाइटवर आढळला.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एका बाळाचे आईवडील झाले आहेत, असे वेबसाइटवर असलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हा फोटो 11 जानेवारीला वेबसाइटवर प्रसिद्ध झाला होता.
चौकशीच्या पुढील टप्प्यात आम्हाला हा फोटो आणखी एका वेबसाइटवर आढळला. हा फोटो ज्या लेखासह वेबसाइटवर पोस्ट केला गेला आहे तो लेख 9 जुलै 2018 रोजी प्रकाशित झाला होता.
छायाचित्राच्या पडताळणीसाठी आम्ही अनुष्का आणि विराट या दोघांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर नजर टाकली. पण असे अधिकृत छायाचित्र कोठेही दिसले नाही.
सोशल मीडियावर केलेला दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनुष्का आणि विराटने आपल्या बाळाचा एकही फोटो शेअर केलेला नाही.
सोबतच अनुष्काची ज्या रुग्णालयामध्ये डिलिव्हरी झाली, त्या मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयामधील कर्मचार्‍यांना बाळाचे फोटो न काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालयातील सुरक्षादेखील आधीपेक्षा अधिक कडक केली आहे. जे लोक आजूबाजूच्या रूम्समध्ये दाखल आहेत, त्यांना भेटायला येणाऱ्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना मुलीची झलकही दिसू नये, याची खास व्यवस्था करण्यात आली आहे.
रुग्णालयाच्या बाहेर छायाचित्रकारांची असलेली गर्दी पाहून अनुष्का आणि मुलीला मागच्या दाराने घरी पाठवण्याचा विचार केला जात असल्याचेही म्हटले जात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.