अनुष्का शर्मा दादासाहेब फाळके पुरस्काराने होणार सन्मानित

0

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने प्रदान केल्या जाणा-या या मानाच्या पुरस्काराची मानकरी अनुष्कादेखील ठरणार आहे.

अनुष्काने अभिनयासोबतच चित्रपट निर्मितीतही पाऊल टाकलेले आहे. त्यामुळे निर्मिती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिला हा सन्मान दिला जाणार आहे. निर्माती म्हणून तिने विविध धाटणीचे चित्रपट केले आहेत.

भाऊ कर्नेश शर्मासोबत अनुष्काने ‘क्लिन स्लेट फिल्म्स’द्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. याद्वारे तिने ‘एनएच 10’ हा पहिला चित्रपट निर्मित केला. त्यानंतर तिने ‘फिलौरी’ आणि ‘परी’ या दोन चित्रपटांची निर्मितीही केली आहे. या चित्रपटांची जास्त चर्चा झाली नाही मात्र तिने निर्मितीचा प्रवासही थांबवला नाही.

अनुष्काने आपल्या प्रॉडक्शनच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकांना काम करण्याची संधी दिली. याचीच दखल घेऊन तिला दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.