नव्या चिमुकलीचे आगमन, आज दुपारी अनुष्काने दिला बाळाला जन्म

विराट म्हणाला : आयुष्यात अनुभवायला मिळाला नवीन अध्याय

0

मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. अनुष्काने मुलीला जन्म दिला आहे. स्वतः विराटने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. ११ जानेवारी २०२१ रोजी ब्रीच कॅण्डी  रुग्लणायात अनुष्काने बाळाला जन्म दिला. आज सकाळीच अनुष्का आणि विराट नेहमीच्या चेकअपसाठी रुग्णालयात गेले होते.

स्वतः विराटने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. ११ जानेवारी २०२१ रोजी ब्रीच कॅण्डी  रुग्लणायात अनुष्काने बाळाला जन्म दिला. आज सकाळीच अनुष्का आणि विराट नेहमीच्या चेकअपसाठी रुग्णालयात गेले होते. आज दुपारी अनुष्का आणि विराट यांना कन्यारत्न झाले आहे. आई आणि बाळाची तब्येत उत्तम असल्याचे विराटने सांगितले आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने  कन्येचे स्वागत केले आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की अनुष्का आणि विराटच्या मुलीला ‘करोनिएल’ म्हणून संबोधले जाईल. याचं मुख्य कारण म्हणजे करोना काळात जन्माला आलेल्या बाळांना ‘करोनिएल’ या विशेष नावाने संबोधले जाते. एवढेच नाही तर या महामारीच्या काळात जन्मलेल्या बाळांना ‘कोविड- किड’ असेही काही ठिकाणी म्हटले जाते.
ऑगस्ट २०२० मध्ये अनुष्का आणि विराट यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचा फोटो शेअर करून संपूर्ण जगाला ही गोड बातमी दिली. तसंच जानेवारी २०२१ मध्ये बाळ जन्माला येईल असेही त्यांनी सांगितले. दोघांनी एकच फोटो शेअर केला ज्यात अनुष्काने काळ्या रंगाचा पोल्का डॉट ड्रेस घातला होता. तिच्या मागे विराट उभा होता. या फोटोत अनुष्का बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसते. ‘आणि आम्ही दोनाचे तीन झाले.. जानेवारी २०२१ मध्ये  तिसरा पाहुण्याचे स्वागत.’

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.