राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार, तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ

तृप्ती देसाई नेमक्या कोणत्या नेत्यावर आरोप करणार, त्यामुळे राजकीय धुरळा उडणार का?

0

मुंबई : राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. फेसबूक पोस्टच्या माध्यमातून तृप्ती देसाईंनी हा दावा केला. पीडितेसह पत्रकार परिषद घेत नेत्याचे बिंग फोडण्याचा इशाराही देसाईंनी दिला आहे.

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. फेसबूक पोस्टच्या माध्यमातून तृप्ती देसाईंनी हा दावा केला  “आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लग्नाच्या, नोकरीच्या अमिषाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार… तृप्ती देसाई यांची बारा वाजता पीडितेसह पत्रकार परिषद” अशी फेसबुक पोस्ट लिहून तृप्ती देसाई यांनी राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली आहे. त्या नेमक्या कोणत्या नेत्यावर आरोप करणार, त्यामुळे राजकीय धुरळा उडणार का, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
थोड्याच वेळात तृप्ती देसाईंची पीडीतेसह 12 वाजता पत्रकार परिषद.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.