आणखी माजी आमदार संपर्कात, लवकरच राष्ट्रवादीत येतील : एकनाथ खडसे
चंद्रकांत दादांची मर्यादा चॉकलेट ते कुल्फीपर्यंत, मंत्रिपद मिळाल्यावर त्यांचे नाव कळले महाराष्ट्राला
मुंबई : चंद्रकांत दादांची मर्यादा चॉकलेट ते कुल्फीपर्यंतच आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर चंद्रकांत दादांचं नाव महाराष्ट्राला कळले. एकदाही आमच्या आंदोलनात किंवा जेलमध्ये मी दादांना पाहिले नाही. त्यांना फार सिरियसली घेऊ नका, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.
खडसे म्हणाले की, मला पक्ष न सोडण्यासाठी कोणीही फोन केला नाही. फक्त चंद्रकांत दादांनी फोन केला होता. अन्यथा कोणालाही माझी गरज नव्हती. साधा संघटन मंत्र्यांचाही फोन आला नाही, तो आला असता तर मी किमान फेरविचार केला असता. आता भाजपमध्ये यूझ अॅन्ड थ्रोची पद्धत आहे, असे खडसे म्हणाले.
कोणत्याही पक्षात स्पष्ट दिशा ठरलेली असते. संघटनात्मक विस्तार हे माझे यापुढचे ध्येय असेल, असे खडसे म्हणाले. राष्ट्रवादीसाठी खान्देशात काम करणे माझ्यासाठी मोठे आव्हान नाही. आमच्या भागात नाथभााऊ म्हणून 70 ते 80 टक्के मते मिळत होती, भाजप किंवा राष्ट्रवादीचा म्हणून नाही. 12 ते 15 माजी आमदार माझ्या संपर्कात आहेत, ते लवकरच राष्ट्रवादीत येतील, असं खडसे म्हणाले.