आयपीएलमध्ये सिलेक्शन न झाल्याने नाराज, युवा क्रिकेटपटूने घेतला गळफास

क्रिकेटपटू करण तिवारीचा मित्राला फोन, सिलेक्शन न झाल्याने आत्महत्या करत असल्याची माहिती

0

मुंबई : ‘आयपीएल’मध्ये सिलेक्शन न झाल्याने नाराज झालेल्या मुंबईतील युवा क्रिकेटपटूने टोकाचे पाऊल उचलले. 27 वर्षीय करण तिवारीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

कुरार पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, करण तिवारी मालाड पूर्व भागातील जानू कंपाऊंडमध्ये इमारतीत आई आणि भावासोबत राहत होता. स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळणारा करण आयपीएलसाठी तयारीही करत होता. ‘आयपीएल’साठी संघाची निवड झाल्याची माहिती त्याला मिळाली, मात्र आपले सिलेक्शन न झाल्याने तो काहीसा नाराज असल्याचे म्हटले जाते. त्याने दहा ऑगस्टला रात्री 10.30 वाजता राजस्थानमध्ये राहणाऱ्या आपल्या मित्राला फोन केला. सिलेक्शन न झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याची माहिती त्याने मित्राला दिली. घाबरलेल्या मित्राने राजस्थानमध्ये असलेल्या करणच्या बहिणीला फोन केला, तिने आपल्या आईला तातडीने फोन केला. मात्र त्याचे कुटुंबीय त्याच्या खोलीत पोहोचून दरवाजा तोडेपर्यंत करणने गळफास घेतला होता, अशी माहिती आहे. घरातील चादरीने पंख्याला दोर लटकावून करणने आत्महत्या केली. करणच्या कुटुंबाने कुरार पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू आहे. करण तिवारी क्रिकेट खेळण्यात तरबेज होता. त्याला कुठल्याही परिस्थितीत ‘आयपीएल’मध्ये खेळायचे होते, असे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.